Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

साडेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण लांबवले

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

साडेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण लांबवले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: शहरातील हिरालाल चौक ते बुरुड गल्ली दरम्यान पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी प्रिया अभिजीत गायकवाड (वय ३०, रा. पूनम गल्ली, लोणारपुरा) या त्यांच्या सासू सोबत रस्त्यावरून जात असताना, पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चालत्या गाडीवरून हिसकावले आणि वेगाने पसार झाले. चोरलेले गंठण १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

पेठ बीड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पुजारी हे या धाडसी चोरीचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.


Categories

Recent Posts