Breaking

चक्क पोलीस ठाण्यातच भावा-भावात हाणामारी !

Updated: मार्च 25, 2026

By Vivek Sindhu

चौघां विरुद्ध गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

चौघां विरुद्ध गुन्हा दाखल

केज :- एकमेकांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेले भाऊ-भाऊ  आपसात एकमेकांना भिडले आणि त्यांनी चक्क एकमेकांशी झोंबाझोंबी केली. या झालेल्या प्रकारा बद्दल ठाणे अंमलदाराच्या तक्रारी वरून पोलिस ठाण्यातच आपसांत झोंबाझोंबी करणाऱ्या चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार दि. २४ मार्च रोजी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास केज पोलीस ठाण्यात जुनेद शाकेर शेख, मुसईब शाकेर शेख (दोघे रा. खाजा नगर, केज) आणि सईद शाकेर शेख ( रा. स्लाबेल अपार्मेट डी एन रोड, मुंबई), सलाउद्दीन नबाब काझी (रा. टिपु सुल्तान चौक, कळंब रोड, केज) हे चौघे २४ मार्च रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यास आले होते. त्यांनी पोलिस ठाण्यात एकमेकांना समोरा समोर पाहताच जुनेद शाकेर शेख, मुसईब शाकेर शेख आणि सईद शाकेर शेख, सलाउद्दीन नबाब काझी

 त्यांनी एकमेकांना मारहाण करीत एकमेकांच्या अंगाशी झोंबाझोबी करून सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करून त्यांनी शांततेचा भंग केला. 

यावेळी पोलिस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार पोलिस जमादार उमेश आघाव यांनी स्वतः पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून जुनेद शाकेर शेख, मुसईब शाकेर शेख आणि सईद शाकेर शेख ( रा. स्लाबेल अपार्मेट डी एन रोड, मुंबई), सलाउद्दीन नबाब काझी या चौघा विरुद्ध गु. र. नं. १५२/२०२६ भा. न्या. सं. १९४(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts