Breaking

विवाहित महिलेचा छुपा पाठलाग करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्हा दाखल

Updated: मार्च 4, 2026

By Vivek Sindhu

विवाहित महिलेचा छुपा पाठलाग करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- एका विवाहित महिलेचा पती हा मोल मजुरीसाठी पुणे येथे गेले असताना तिचा मागील सहा ते सात महिने तिचा छुपा पाठलाग केल्या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारी वरून चौकशीअंती ॲट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील एका विवाहित महिलेचा पती हा मजुरीसाठी पुणे येथे राहत आहे. तसेच त्याच्या सोबत चार मुली देखील पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी सोबत आहेत. तर त्याची पत्नी एका लहान मुलीसह केज तालुक्यातील तिच्या गावी राहत आहे. दरम्यान ती महिला गावात तिच्या लहान मुलीसह एकटी राहत असल्याची संधी साधून गावातील एक व्यक्ती हा जून २०२४ पासून ते जानेवारी २०२५ पर्यंत तिचा छुप्या पद्तीने पाठलाग करीत होता. ती कामासाठी शेतात जात असताना आणि दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडल्यास तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असे. परंतु सदर विवाहित महिला ही गावात एकटी आणि असहाय असल्याने तिने या बाबत कुठे वाच्यता केली नाही किंवा तक्रार दिली नाही. 

त्या नंतर ती महिला पुणे येथे पती आणि मुली यांना भेटण्यासाठी गेल्या नंतर तिने ही सर्व माहिती तिच्या पतीला दिली. त्या नंतर जानेवारी २०२५ रोजी तिने पुणे येथील महिला आयोगाकडे तिच्यावर होत असलेल्या अन्याय प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

महिला आयोगाने दिला चौकशी आदेश

पीडित महिलेने पुणे येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात तक्रार दाखल करताच महिला आयोगाने त्याची गंभीर दखल घेत सदर प्रकरण हे केज पोलिसांकडे पाठविले. त्या महिलेच्या तक्रारी संदर्भात केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कामात अत्यंत सतर्क असलेले पोलिस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे यांनी प्राथमिक व सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान तक्रारीची सत्यता समोर आल्या नंतर त्यांनी ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगून अहवाल सादर केला.

पावणे दोन वर्षा अखेर गुन्हा दाखल

विवाहित महिलेच्या अत्याचाराच्या घटनेला सुमारे पावणे दोन वर्षा नंतर नराधम प्रदीप चंदनशिव याच्या विरुद्ध गु. र. नं. १०१/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७८(१) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३(१) (डब्ल्यू), (i) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.


Categories

Recent Posts