Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अग्रीम द्या

आ.संदीप क्षीरसागर यांची मागणी

बीड दि.२२ (प्रतिनिधी):- बीड मतदारसंघासह जिल्हाभरात पावसाच्या अनियमिततेमुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना या संकटातून धीर देण्यासाठी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा अग्रीम मंजूर करून रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
                यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात शेतीला पूरक असा एकही पाऊस झाला नाही.‌ शेतकऱ्यांनी चालू हंगामात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद इत्यादी पिकांचा मोठ्या प्रमाणावर पेरा केलेला आहे. सद्यस्थितीला मान्सूनचा अर्ध्यापेक्षा जास्त काळ लोटला असला तरी शेतीसाठी पूरक पाऊस झाला नाही. अगोदरच पावसाने दडी मारल्याने पिके करपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच कालच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात आलेल्या उडीद, मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधव मोठ्या आस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना या मोठ्या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीची मोठी गरज असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा अग्रीम मंजूर करून तातडीने संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यांवर व
वितरीत करण्यासाठी सत्वर कार्यवाही करा. अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी राज्य सरकार व बीड जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याबाबत आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, कृषी विभाग आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.

Saturday 23rd of September 2023 12:34 PM

Advertisement

Advertisement