वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्र.११ मध्ये स्वाभिमान दिन साजरा
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील प्रभाग क्र.११ मध्ये मंगळवार, दिनांक १० मे २०२२ रोजी आयोजित स्वाभिमान दिन कार्यक्रमासाठी सर्व सूजाण नागरीक, युवक, युवती यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते अमोल सुभाषराव हातागळे यांनी प्रभाग क्र.११ मधील जनतेचे आभार मानले आहेत. सामाजिक बांधिलकीतून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वाभिमान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या बाबतीत अधिक माहिती देताना वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाईचे माजी शहराध्यक्ष अमोल सुभाषराव हातागळे यांनी सांगितले की, भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माजी खा.एॅड.
प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई शहरातील लाल नगर, क्रांती नगर, आकाश नगर, आझाद नगरच्या वतीने अमोल हातागळे यांच्या नेतृत्वात आणि वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, जिल्ह्याचे नेते धम्मानंद साळवे, बाबुराव मस्के, प्रशांत बोराडे, अक्षय भुंबे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व सूजाण नागरीक, महिला भगिनी, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यांच्या साक्षीने माजी खा.एॅड.प्रकाशजी आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला. या निमित्ताने अंबाजोगाई शहरातील ज्यांचे भारतीय लोकशाही व संविधानावर नितांत प्रेम, विश्वास आणि आदर आहे अशा सर्वधर्मिय वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन राजकीय व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प आपण केला असल्याचे वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाईचे माजी शहराध्यक्ष अमोल सुभाषराव हातागळे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. या वेळेस उपस्थितांनी माजी खा.एॅड.प्रकाशजी आंबेडकर यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि अमोल भाऊ हातागळे मित्र परिवार आदींनी पुढाकार घेतला.
