बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यकर्ते अहेमद पप्पुवाले यांनी दिले १० बेंच
येथील सामाजिक कार्यकर्ते अहेमद पप्पुवाले यांनी बांधिलकी जोपासत सोमवार,दिनांक १० मे रोजी १० बेंच दिले आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय, गवळीपुरा आणि गवळी समाज बांधवांच्या स्मशानभूमी (कब्रस्तान) या ठिकाणी भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अहेमद पप्पुवाले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत वयस्कर लोकांना बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बसण्याचे १० बेंच दिले आहेत. सातत्यपूर्ण समाजकार्य करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श उभा केला आहे. अंबाजोगाई शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील सामान्यातील असामान्य कामगिरी करून त्यांनी तरूणांपुढे एक आदर्श उभा केला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा एक सच्चा व निष्ठावान कार्यकर्ता म्हणून लहान-थोर ज्येष्ठांच्या पाठबळावर अहेमद पप्पुवाले यांची सर्वदूर ओळख आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना अंबाजोगाई व परिसरातील युवकांना एकत्र करून पप्पुवाले यांनी युवक, ज्येष्ठ नागरिक यांना वेळोवेळी सहकार्य व मदत करून सर्वधर्मसमभाव जोपासण्याचे काम करून अनेकांना आत्मनिर्भर होण्यासाठी अहेमद पप्पुवाले हे स्वावलंबनाचे धडे देत आहेत हे विशेष.
