स्वाराती रूग्णालय येथे राष्ट्रीय औषध सतर्कता सप्ताह कार्यक्रम संपन्न
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय व महाविद्यालय येथे फारम्याकोव्हीजीलेन्स सप्ताह 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळादरम्यान साजरा करण्यात करण्यात येत आहे. फारम्याकोव्हीजीलेन्स सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी पद्युत्तर विद्यार्थि, परिचारिका व कर्मचार्यांमध्ये मध्ये फारम्याकोव्हीजीलेन्स बद्दल जनजागृती करण्यात येत आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी या सप्ताहाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या चे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम दरम्यान मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.
अधिष्ठाता डॉ.खैरे यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, जेव्हा एखाद्या रुग्णाला औषधामुळे अडवर्स ड्रग रिएक्शन येते त्याला त्वरित आवश्यक ते वैद्यकीय उपचार देऊन आढळून आलेला दुष्परिणाम फारम्याकोव्हीजीलेन्स च्या संकेत स्थळावर फारम्याकोव्हीजीलेन्स साहाय्यक यांनी र्ीविरींश करावा जेणेकरून या उपक्रमाचा हेतू साध्य करण्यास आपल्या रुग्णालयाचा हातभार लागेल. या नंतर औषादशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जे.बी.जाजु यांच्या मार्गदर्शना खाली डॉ.अशा जाधव यांनी होमियोप्याथीच्या विद्यार्थ्यांचे या उपक्रमा आंतर्गत ट्रेनिंग घेतले. तसेच डॉ.सागर व फारम्याकोव्हीजीलेन्स साहाय्यक राम माने यांनी आंतरवशियाता व परिचारिका यांचे ट्रेनिंग घेतले.
दिनाक 20 सप्टेंबर रोजी पद्युत्तर विद्यार्थिचे ट्रेनिंगचा उपक्रम घेण्यात आला. दिनाक 21 सप्टेंबर रोजी रुग्णालयचा बाह्य विभागात जनजागरनचा व पोस्टर सपर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व विविध विभागातील अनेक कर्मचार्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास उप.अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ. जे बी जाजू, रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ.राकेश जाधव, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.राजेश संबुतवाड, डॉ. गणेश तोडगे डॉ.विनोद वेदपाठक व इतरांनी सहभाग नोंदविला. तो त्याने होणारे विविध अडवर्स ड्रग रिएक्शन यांच्या बद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित केला जातो. एखाद्या औषधामुळे आलेल्या अडवर्स रिएक्शन झतझख (फारम्याकोव्हीजीलेन्स प्रोग्राम ऑफ इंडिया) च्या ढेश्रश्र षीशश छे- 18001803024 कोणीही कॉल करून कळवू शकते. स्वा.रा. ती. शा. वै. म. वि. हे मराठवाड्यातील एकमेव कार्यक्षम झतझख सेंटर आहे.