सैनिक व माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा यांना मालमत्ता करातून सुट
आ.नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे अंबाजोगाई नगरपरिषदेने घेतला ठराव
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - राज्य शासनाने राज्यातील नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणार्या सर्व माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांना ‘मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना’ अंतर्गत मालमत्ता करातून पुर्ण सुट देण्याचा निर्णय घेतला होता. या बाबत अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि सदर योजनेचा लाभ शहरातील, नगरपरिषद हद्दीत वास्तव्य करणार्या माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मिळावा यासाठी केज मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना नुकतेच पत्र देवून या बाबत पाठपुरावा केला होता. आ.मुंदडा यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी सर्व माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांना मालमत्ता करातून सुट देण्याचा ठराव बुधवार, दि. 20 सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्याचे सर्व माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई नगर परिषदेची मुदत 3 जानेवारी 2022 रोजी संपुष्ठात आल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडील आदेशान्वये मुख्याधिकारी नगर परिषद अंबाजोगाई यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नगर परिषदेची मुदत समाप्त झाल्याने माहे जानेवारी 2022 पासुन नगरपरिषदेचे कोणतही सभा अस्तित्वात राहिलेली नाही. त्यामुळे नगर शपरिषदेच्या वतीने कामांच्या निवड निश्चितेचे व मंजुरीचे सर्वाधिकार हे प्रशासक यांना कायद्याने प्राप्त झाले आहेत. विद्यमान मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आहे. जनतेच्या मागणीनूसार, आवश्यक असलेल्या कामांना मंजुरी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आ.नमिता मुंदडा यांच्या संदर्भीय शासन निर्णय जोडलेल्या सुचनेवरून नगर परिषद अंबाजोगाई यांनी मालमत्ता करातून सुट देण्याबाबत आठ अटी व शर्ती नूसार बुधवार, दि.20 सप्टेंबर रोजी ठराव घेवून सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे. या बाबत नगरपरिषद कार्यालय पुढील कार्यवाही करीत आहे.
काही दिवसांपूर्वी केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी राज्य शासनाने राज्यातील नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणार्या सर्व माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांना ‘मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना’ अंतर्गत मालमत्ता करातून पुर्ण सुट देण्याचा निर्णय घेतला होता. या बाबत अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि सदर योजनेचा लाभ शहरातील, नगर परिषद हद्दीत वास्तव्य करणार्या माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांना मिळावा यासाठी केज मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना नुकतेच पत्र देवून या बाबत पाठपुरावा केला होता. आ.मुंदडा यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी सर्व माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांना मालमत्ता करातून सुट देण्याचा ठराव बुधवार, दि. 20 सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्याचे सर्व माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. तसेच केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांचे सर्व आजी - माजी सैनिक व सैनिक परिवाराच्या वतीने आभार माणण्यात येत आहेत.