Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सुगाव मध्ये २५ वर्षानंतर एक गाव एक गणपतीच अयोजन

दररोज मंडळाचा एक अध्यक्ष;बर्दापुर पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळाचा सन्मान.

अंबाजोगाई - तालुक्यातील सुगाव येथे मंडळाचे दोण व गल्ली बोळात बाल गणेशाची स्थापना गेली २५वर्षापासुन केली जात आहे.एक गाव एक गणपती ही शासणाची संकल्पना सत्यात उतरण्यासाठी यापुर्वीही ग्रामस्थानी प्रयत्न केले होेते पण ते प्रयत्न असफल राहिले होते ते यंदाच्या गणेश उत्सवात ग्रामस्थानी एक गाव एक गणपती ही शासणाची संकल्पना सत्यात उतरवली आहे.त्यामुळे बर्दापूर ठाण्याच्या वतीने सपोनी महेंद्रसिंग ठाकूर,पिएसआय शिवशंकर चोपणे,बिट आमलदार एल.आर.बिरगड,महादेव आवले यांनी मंडळाच्या पदाधीकाऱ्यांचा सन्मान केला.

सुगाव येथे गेली २५ वर्षापासुन मंडळाचे दोण गणपती आहेत.दोण गणेश मंडळाचे  दोण गट आशी स्थिती गावात आसल्याने वर्गणी, संस्कृतीक,धार्मिक,समाजीक कार्यक्रम,देखावे यासाठी दोण्ही मंडळात मोठी स्पर्धा व्हायची.वर्गणी देतानां सुध्दा ग्रामस्थाचा  मोठी पंचायत व्हायची.मंडळात आसलेली चुरस गणेश स्थापनेपासुन ते विसर्जनपर्यंत कायम आसायची त्यामुळे गाव गटा तटात ढवळून जायचे.आसी स्थिती गेली २५वर्षांपासुन होती.गेली आनेक वर्षापासून शासणाच्या संकल्पनेनुसार एक गाव एक गणपती व्हावा यासाठी ग्रामस्थ व जागरूक नागरीकांनी प्रयत्न केला पण ते आज पर्यंत असफल झाले आहेत. यंदा गणेशा आगमनाची चाहुल लागताच सरपंच बंडू शिंदे,उपसरपंच गणीखाँ पठाण,सामाजीक कार्यकर्ते सुंदरराव शिंदे,मा. सरपंच नामदेव शिंदे,हरीशचंद्र शिंदे, शशीकांत टेकाळे,दत्तात्र्य शिंदे,दगडू टेकाळे, उनकेश्वर चव्हाण, दत्ता टेकाळे,अनील अंबाड, सतीश टेकाळे,उत्तम शिंदे, सिध्देश्वर टेकाळे,सुखदेव शिंदे,आनंत शिंदे यांनी दोण्ही मंडळाचे पदाधीकारी व ग्रामस्थांच्या बैठकीचे अयोजन गणेश मंडळाच्या आगमणापुर्वी केले होते. या बैठकीत प्रयत्न करुण एक गाव एक गणपती ही संकल्पना सत्यात उतरवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.सरपंच बंडू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तर सामाजीक कार्यकर्ते दत्ता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवात दररोज एक अध्यक्षाचा निर्णय घेण्यात आला. उत्सवात सामाजीक,धार्मिक, सांस्कृतिक व लोकपयोगी कार्यक्रम करण्याचा ऐकमुखी निर्णय घेतला आहे.सध्या पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतकरी शेतमजुर हे अर्थीक विवंचनेत आहेत.त्यामुळे वर्गणी जमा नं करता गणेश उत्सवाचा जो खर्च होईल त्या खर्चाची जबाबदारी सरपंच बंडू कारभारी शिंदे यांनी स्वतः घेतल्यामुळे यंदा वर्गणी पासुन सुगाव ग्रामस्थानां मोठा दिलास मिळाला आहे.एक गाव एक गणपती व्हावा यासाठी बिट आमलदार एल.आर.बिरगड यांनी ही प्रयत्न केला होता.सुगाव ग्रामस्थांच्या वतीने एक गाव एक गणपती संकल्पनेचा ठराव बर्दापूर पोलीस स्टेशनला देण्यात आला.सपोनी महेंद्रसिंग ठाकूर,पिएसआय शिवशंकर चोपणे,बिट आमलदार एल.आर.बिरगड,महादेव आवले यांनी बर्दापूर ठाण्याच्या वतीने मंडळाचे पदाधीकारी व विशेष प्रयत्न करणारे दगडू टेकाळे व हरीशचंद्र शिंदे यांचा सन्मान पुष्पहार,शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी सरपंच बंडू शिंदे,उपसरपंच गणीखाँ पठाण,सामाजीक कार्यकर्ते सुंदरराव शिंदे,मा. सरपंच नामदेव शिंदे,हरीशचंद्र शिंदे,दगडू टेकाळे,शशीकांत टेकाळे,दत्तात्र्य शिंदे गणेश मंडळाचे पदाधीकारी व बहुसंख्य सुगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती.

गावातील शांतता भंग होऊ नये यासाठी प्रयत्न

सुगवमध्ये गेली २५ वर्षापासुन दोण गणेश मंडळ होते. दोण गट दोण मंडळ त्यामुळे उत्सव काळात मोठी स्पर्धा आसायची. ते या गणेश उत्सवात एकत्र आण्यासाठी व गावातील शांतता अबाधीत राहावी  यासाठी ग्रामस्थानी एकत्र बसुन प्रयत्न केले आणी ते सफल झाल्यामुळे एक गाव एक गणपतीची स्थापणा २५वर्षानंतर मोठया उत्सहात करण्यात आली आहे.

बंडू कारभारी शिंदे सरपंच सुगाव


यापुर्वी गणेश मंडळाचा अध्यक्ष मुस्लीम

सुगावमध्ये हिंदू, मुस्लीम समाज हा ऐकोप्याने व गुण्यागोवींदाने राहातो. सण उत्सव,ईद हे एकत्रीपणे मिळूण साजरी करतात. त्यामुळे सुगावमध्ये आजपर्यंत कधीही तेड निर्माण झाली नाही. गावात ऐकोपा नांदावा यासाठी यापुर्वी गणेश मंडळाचा आध्यक्षपदी रुबाब पठाण यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात विवीध सामाजीक, धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले होते.

Tuesday 19th of September 2023 06:31 PM

Advertisement

Advertisement