Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

चोरट्यांनी १७ शेळ्या, ५ बकरे पळवले

परळी : तालुक्यातील वाघबेट येथे अज्ञात चोरट्यांनी शेळीपालन शेड मधील अडीच लाख रुपये किमतीचे १७ शेळ्या आणि ५ बकरे चोरून नेले. शनिवारी (दि.१५) पहाटे ही घटना उघडकीस आली. 

बालासाहेब ओमप्रकाश गित्ते हे शेतीसोबत बंदिस्त शेळीपालन करून उपजीविका भागवतात. शुक्रवारी सायानाकली ७ वाजता त्यांनी नित्यनेमाप्रमाणे सर्व शेळ्या आणि बकऱ्यांना चारापाणी करून शेळीपालन शेडमध्ये कोंडले आणि घरी निघून गेले. त्यानंतर रात्रीतून कधीतरी अज्ञात चोरट्यांनी शेळीपालन शेडची लोखंडी उपसून आत प्रवेश केला आणि एकूण अडीच लाख रुपये किमतीच्या १७ शेळ्या आणि ५ बकरे चोरून नेली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला पूरक व्यवसाय असलेल्या शेळीपालन शेडमधील शेळ्या, बकरे चोरीला गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Saturday 16th of October 2021 09:51 PM

Advertisement

Advertisement