Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

एच आय व्हि तपासणी व आरोग्य जनजागृती शिबीर गोपाळपूर येथे संपन्न

गोपाळपूर येथे बचत गटातील व ऊसतोड कामगार महिलांची एच.आय.व्ही तपाणी शिबिराचे आयोजन एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामिण रुग्णालय धारूर ,ग्रामिण विकास मंडळ  बनसारोळ,उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने एच. आय.व्ही/एड्स ,कोरोना,गुप्त रोग व क्षयरोग या  आजारा बाबत जनजागृती व मार्गदर्शन एच. आय .व्ही.तपासणी कार्यक्रमाचे आयोजन वाचनालय गोपाळपुर येथे संपन्न झाले.

       यावेळी ग्रामीण रुग्णालय धारूरचे समुपदेशक प्रेमानंद स्वामी व ग्रामिण विकास संस्थेचे भीमा कांबळे यांनी उपस्थित बचतगटातील महिलांना एच.आय.एड्स, कोरोना,क्षय ,व गुप्त रोग व या बाबत मार्गदर्शन केले.यानंतर प्रयोगशाळा तंञज्ञ अधिकारी डी. व्ही.तिवारी  यांनी उपस्थित 32 महिलांची ऐच्छिक एच.आय. तपासणी केले.यावेळी उमेद प्रकल्प च्या रुपाली अंकुशे,स्वाती अंकुशे उपस्थित होत्या . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामिण विकास संस्थेच्या च्या सिंधू अदमाने ,छाया चोपडे यांनी सहकार्य केले

Saturday 16th of October 2021 08:40 PM

Advertisement

Advertisement