Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आ. सुरेश धस यांच्या आमदार फंडातून दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकांचे लोकार्पण

आष्टी, शिरूर, पाटोद्यातील रुग्णांची गैरसोय दूर होणार

आष्टी (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील गंभीर रूग्णांना ऐनवेळी उपचार घेण्यासाठी अत्याधुनिक रूग्णवाहिका नसल्याने वर्षभरात बरेच जण मृृृृृृृत्यूला कवटावत आहेत. कारण आष्टी सारख्या ठिकाणी अत्याधुनिक रूग्णवाहिका बोलावयाची झाल्यास नगर-बीडहून बोलवूण त्याचे भाडे परवडण्यासारखे नसते आणि वेळेवर येत नाही. त्यामुळे मी आज आष्टी ग्रामीण रूग्णालयात एक व शिरूर, पाटोदा ग्रामिण रूग्णालयासाठी एक अशा दोन अत्याधुनिक सुविधांनी युक्त सी-टाईप ॲम्बुलन्स माझ्या आमदार फंडातून लोकार्पण करीत असून, येथून पुढे कोणालाही उपचारासाठी रूग्णवाहिकेला जास्तीचे पैसे देण्याची गरज पडणार नसल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.

राज्याचे माजी मुख्यमंञी व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज गुरूवार दि.22 रोजी अत्याधुनिक कार्डियाक रूग्णवाहिकेचे लोकार्पण आ.सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास जि.प.सदस्य प्रकाश कवठेकर,नगराध्यक्ष भारत मुरकुटे, उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर,माजी सभापती रमजान तांबोळी,कडा सरपंच अनिल ढोबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल टेकाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास मोराळे,डॉ.घोडके,पाटोदा नगरसेवक राजू जाधव,सुनील मेहेर,संतोष मेहेर,नितीन मेहेर,राहुल मुथ्था,किशोर झरेकर आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना आ.धस म्हणाले, आष्टी पाटोदा व शिरूर हे तिन्ही तालुके ग्रामीण असून मागील कोरोना काळात रूग्णांना वेळेवर उपचार घेण्यासाठी दाखल न केल्याने किंवा आॅक्सीजन ची रूग्णवाहिका न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले. ह्याच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आज आपण ना.फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे २८ लक्ष रूपायाची रूग्णवाहिका आष्टी आणि शिरूर पाटोदा साठी एक आशा दोन अत्याधुनिक कार्डियाक रूग्णवाहिका देत आहोत.अजून दोन रूग्णवाहिका ह्या लातूर आणि उस्मानाबादसाठी माजीमंञी व आमच्यानेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे चार दिवसांनी लोचार्पण करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.तसेच रूग्णांची परिस्थिती नातेवाईकांचे हाल मी कोरोना काळात जवळून पाहिले आहेत.रूग्णांना वेळेवर उपचारासाठी दाखल करण्यात न आल्याने किंवा जास्तीचे भाडे सांगितल्याने रूग्णांना जीव गमवावा लागला आहे. आता या भागातील लोकांना आपण आपल्या फंडातून सर्व सुविधायुक्त रूग्णवाहिका देत असून,यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना जास्तीचे पैसे मोजण्याची गरज पडणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले.

खुल्या मॅरेथाॅन स्पर्धा संपन्न

ना.फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी आणि कडा येथे खुल्या मॅरेथाॅन स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये आष्टीत 156  तर कड्यामध्ये 95 स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला.या मॅरेथाॅनमध्ये विजेत्या स्पर्धकांना प्रथमला शिंदे रोहित जयमल्हार 11 हजार, द्वितीय पडोळे किरण 7 हजार , तृतीय जगदाळे अनिल ला 4 हजार बक्षीस तर  कडा येथील मॅरेथाॅन स्पर्धेत प्रथम रामदास बडेला 11 हजार  द्वितीय सोहेल पठाणला 7 हजार बक्षीस, तृतीय ला महाजन अंकुशला 4 हजार तर उतेजनार्थ 15 स्पर्धेकांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.

Thursday 22nd of July 2021 08:25 PM

Advertisement

Advertisement