Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाई बाजार समितीवर पुन्हा मुंदडा गटाची सरशी

प्रशासकीय मंडळ रद्द होवून संचालक मंडळाने घेतला पदभार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला उच्च न्यायालयाकडून  मुदतवाढ प्राप्त झाली असून आहे या संचालक मंडळाने बाजार समितीचा कारभार चालवावा असे आदेश न्यायालयाकडून मिळाल्यामुळे नेमण्यात आलेले प्रशासकीय संचालक मंडळ रद्द ठरवून आहे या संचालक मंडळास मुदतवाढ मिळाल्याने मुंदडा गटाची मजबुत पकड पुन्हा बाजार समितीवर निर्माण झाली आहे.

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपुष्ठात आली. कोरोनाच्या कालावधीमुळे शासनाने सर्वच मुदत संपलेल्या बाजार समित्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. अंबाजोगाईच्या बाजार समितीला ही मुदतवाढ मिळाली. मात्र येथील एका गटाने संचालक मंडळा ऐवजी प्रशासक नेमणुकीसाठी मंत्रालयातून अधिकार आणले व बाजार समितीवर काही दिवस प्रशासकाची नेमणूक केली. त्यानंतर दोन महिन्यांनी प्रशासकीय संचालक मंडळ बाजार समितीवर आणले. बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे, राजुशेठ भन्साळी, राजाभाऊ गंगणे व इतर संचालकांनी या प्रशासकाच्या निवड प्रक्रियेस न्यायालयात आवाहन दिले. न्यायालयाने बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ दिली. सोमवारी या संचालक मंडळाने पदभार स्विकारला. मधुकर काचगुंडे, राजशेठ भन्साळी, राजाभाऊ गंगणे, इंद्रजीत निळे, भैरवनाथ देशमुख, सुनिल लोमटे यांच्यासह संचालकांची यावेळी उपस्थिती होती. 

बाजार समितीच्या गेल्या पंचवार्षीक निवडणूकीत मुंदडा व धनंजय मुंडे यांनी एकत्रित येवून बाजार समितीवर प्राबल्य मिळविले होते. मुंदडा गटाचा सभापती तर मुंडे गटाचा उपसभापती असे समिकरण जुळवत बाजार समिती ताब्यात घेण्यात आली. मात्र पुढे मुंदडांनी भाजपामध्ये प्रवेश केला व सर्व राजकीय समिकरणे बदलली. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासकाच्या माध्यमातून कुरघोडीचे राजकारण सुरू होते. मात्र या राजकाणावर ही मात करत मुंदडा गटाने पुन्हा बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे.

Tuesday 2nd of March 2021 09:47 PM

Advertisement

Advertisement