भारतीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे असतात, जे अचानक झळकतात, इतिहास घडवतात, आणि पुन्हा शांततेत हरवून जातात. पण त्यांच्या पुनरागमनाने एक नवी आशा निर्माण होते. असाच एक नाव म्हणजे – करुण नायर! २०१६ मध्ये तिहेरी शतक ठोकणारा केवळ दुसरा भारतीय खेळाडू, आठ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परततोय. इंग्लंडमधील हेडिंग्ले टेस्टमध्ये ‘Big Comeback’ करणारा नायर, पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचतोय.