ग्राहकांचा विश्वास व सहकार्याच्या बळावरच पिपल्स बँकेने हे यश मिळवले – राजकिशोर मोदी

अंबाजोगाई – अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि.अंबाजोगाई या बँकेला एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले यासाठी शहरी सहकारी बँक गटात ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार – २०२५’ ने नुकतेच गौरवविण्यात आले आहे. अंबाजोगाई पीपल्स बँकेने पारदर्शक, गतिमान कारभार व तत्पर सेवेला नेहमीच प्राधान्य दिले आहे.

त्यामुळे नेहमीच उत्तम टीमवर्क करून बँकेने सभासद, ठेविदार, ग्राहक आणि हितचिंतक यांची विश्वासार्हता कमावली व याच विश्वासाच्या बळावरच बँक हे यश मिळवू शकली असे बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले.

यंदा चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेस मिळालेला पुरस्कार हा बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, सर्व शाखाधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या उत्तम टीम वर्कचेच फलित आहे.

सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना एखाद्या बँकेने केंद्र सरकार, आरबीआय, सहकार खाते आणि बँकींगचे सर्व नियम पाळून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत बँकींग सेवा, विविध सुविधा उपलब्ध करून देत आर्थिक वर्षात आपला एनपीए शुन्य टक्के ठेवण्याचा, कमीत-कमी राखण्याचा अटोकाट प्रयत्न केला पाहिजे, यासाठीच काटेकोरपणे काम करीत बॅंकेकडून एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले जाते.

अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि.अंबाजोगाई या आपल्या बँकेने ही आपला एनपीए हा कमीत-कमी राखण्याचा, ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न प्रत्येक आर्थिक वर्षांत केलेला आहे. अंबाजोगाई पीपल्स बँकेने एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले याची दखल घेत आशिया खंडातील सहकारी बँकिंगसाठी सर्वात मोठे व्यासपीठ असलेले भारत कॉपरेटीव्ह बँकिंग समितीच्या वतीने मुंबई येथील ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलच्या सभागृहात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंबाजोगाई पीपल्स बँकेला एनपीएचे सर्वोत्तम व्यवस्थापन करणारी शहरी सहकारी बँक या गटात ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.

सदरचा पुरस्कार दळणवळण मंत्रालय, भारत सरकारचे उपमहासंचालक सुमनेश जोशी यांच्या हस्ते बँकेचे तज्ज्ञ संचालक संदेश बोराडे, संगणक विभागप्रमुख गणेश रोकडे यांनी स्विकारला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ग्रंथ असे आहे. यावेळी उपमहासंचालक जोशी यांनी, सध्याचे बँकिंग व्यवहार हे डिजिटल असून यामुळे बँकेस अत्यंत वेगाने गती मिळाली आहे. मात्र सायबर क्राईमची जोखीम सुध्दा प्रचंड वाढल्याने सर्वांनी सतर्कता बाळगावी असे सांगितले. भारत जगातील तंत्रज्ञानात लवकरच प्रथम क्रमांकावर असेल असेही ते यावेळी म्हणाले. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लि.अंबाजोगाई या आपल्या बँकेने सुरूवातीपासून एनपीए कमीत-कमी राखला आहे.

सर्वच शाखांतून बँकींग विषयक सर्व आधुनिक सेवा, सुविधा, नवे तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार बँक सभासद आणि ग्राहकांना पुरविते. यापूर्वी ही बँकेस विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या सर्वांगिण प्रगती आणि विकासात बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, सर्व संचालक वसंतराव चव्हाण, ऍड.विष्णुपंत सोळंके, पुरूषोत्तम चोकडा, सुरेश मोदी, ऍड.सुधाकर कराड, श्रीमती वनमाला रेड्डी, संकेत मोदी, शेख दगडू शेख दावल, सौ.स्नेहा हिवरेकर, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, हर्षवर्धन वडमारे, तज्ज्ञ संचालक सचिन बेंबडे, तज्ज्ञ संचालक सुनिल राजपुरोहित, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे, बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक, बँकेचे सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारीवृंद व पिग्मी एजंट यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व योगदान असल्याची माहिती चेअरमन राजकिशोर मोदी यांनी दिली. अंबाजोगाई पीपल्स बँकेस पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वस्तरांतून बँकेचे अभिनंदन व कौतुक होत आहे.