Breaking

तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न : ६५ वर्षाच्या नराधमा विरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल 

Updated: मे 13, 2026

By Vivek Sindhu

शेतरस्त्याच्या वादातून महिलेला मारहाण करत विनयभंग; पाच जणांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज:- केज तालुक्यातील एका गावात तीन वर्षाच्या एका निरागस मुलीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ६५ वर्षाच्या नराधमा विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे आई शेतात कामाला गेली असताना एक तीन वर्षाची लहान मुलगी आणि तिचा सात वर्षाचा भाऊ हे वृद्ध आजी आणि आजारी असलेल्या वडिला जवळ होते. दोघे बहीण भाऊ घरच्या बाहेर खेळत असताना ६५ वर्षाचा दारू पिलेला इसम शाहु काशीबा दुनघव हा त्या लहान मुलीला त्याच्या घरात घेऊन गेला. मुलगी आपल्या घरी दिसत नसल्याने आजी व वडिलांनी तीचा शोध घेतला असता ती लहान मुलगी ही शाहु काशीबा दुनघव याचे घरात टेबलाच्या खाली बसली असल्याचे आढळून आले. वडील आणि आज्जीला पाहून मुलगी घाबरून रडत होती आणि तिच्या अंगावर असलेली पॅन्टची एक बाजू पायातुन बाहेर काढलेली होती. त्या नंतर त्या लहान मुलीने घडलेला प्रसंग तिच्या आईला सांगितला.

मुलीच्या आईच्या तक्रारी वरून नराधम आरोपी शाहू कशीबा दुनघव याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु र नं २८६/२०२६ भा न्या सं ७४, ७६ यासह पोक्सोचे कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात :- बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच आरोपी शाहू दुनघव याला पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे यांनी त्याला ताब्यात घेतले.


Categories

Recent Posts