Breaking
Updated: एप्रिल 24, 2026
परळी ग्रामीण भागात मोठी घरफोडी; सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: तालुक्यातील मांडवा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी भागवत आंबाजी फड (वय ६५, रा. मांडवा) हे २२ एप्रिलच्या रात्री घरात झोपलेले असताना किंवा बाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी पेटी आणि ज्वारीच्या कोठीचे कडीकोडा तोडून कपाटातील साहित्य विस्कटले. या चोरीत ६० हजार रुपये रोख आणि १ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये १० ग्रॅमची सोन्याच्या मण्यांची माळ, १० ग्रॅमचे सेव्हन पीस, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि सोन्याची नथनी यांचा समावेश आहे. भागवत फड यांनी दिलेल्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निमोणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.