Breaking

वासरू शेतात गेल्याच्या रागातून तरुणाचे नाक फोडले; केजमधील घटना

Updated: एप्रिल 24, 2026

By Vivek Sindhu

रस्त्यावर सरपण ठेवल्याच्या वादातून शिरूर कासारमध्ये हाणामारी; चौघांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: आपले वासरू दुसऱ्याच्या शेतात गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात आरोपींनी एका तरुणाला आणि त्याच्या आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून ही घटना कानडीमाळी येथे घडली आहे.

विष्णु सतिष राऊत (वय २४, रा. कानडीमाळी) याचे वासरू आरोपी बाबासाहेब ज्ञानोबा राऊत यांच्या शेतात गेले होते. याचा राग धरून आरोपी प्रतिक बाबासाहेब राऊत याने विष्णूच्या नाकावर काठीने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. तसेच बाबासाहेब राऊत आणि क्षितीज शंकर राऊत यांनी काठीने विष्णूच्या पाठीत व डोक्यात मारहाण करून त्याला जखमी केले.

यावेळी विष्णूची आजी मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपींनी तिला ढकलून दिले आणि तिच्या डोक्यात काठी मारून तिलाही जखमी केले. आरोपींनी विष्णूच्या आई-वडिलांनाही मारहाण केली आणि तुम्हाला कुठेही गाठून काटा काढू, अशी धमकी दिली. विष्णू राऊत याच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत


Categories

Recent Posts