Breaking
Updated: एप्रिल 24, 2026
परळी ग्रामीण भागात मोठी घरफोडी; सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर: आंबेवडगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतात बांधलेल्या तीन शेळ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात मनोज उर्फ सोन्या मुंडे याच्यासह चौघांविरुद्ध संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशाबाई भीमराव आव्हाड (वय ४५, रा. आंबेवडगाव) यांनी आपल्या शेतातील कोठ्यावर तीन शेळ्या बांधल्या होत्या. १ एप्रिल ते २ एप्रिलच्या दरम्यान रात्रीच्या वेळी अज्ञात आरोपींनी या शेळ्या चोरून नेल्या. चोरीला गेलेल्या शेळ्यांमध्ये दोन काळ्या रंगाच्या शेळ्या (किंमत प्रत्येकी २० हजार) आणि एक पांढऱ्या डागाची शेळी (किंमत १५ हजार) असा एकूण ५५ हजार रुपयांचा माल होता.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, मनोज उर्फ सोन्या मुंडे, सुमीत प्रमोद कांगवे, सुनील मस्के आणि नवनाथ गावडे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. आशाबाई आव्हाड यांच्या तक्रारीवरून धारूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार घोळवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.