Breaking

प्रवक्ते राम कुलकर्णी गोपीनाथ गडावर नतमस्तक; परळी भाजपाकडून पहिला सत्कार

Updated: एप्रिल 24, 2026

By Vivek Sindhu

प्रवक्ते राम कुलकर्णी गोपीनाथ गडावर नतमस्तक; परळी भाजपाकडून पहिला सत्कार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी पुनर्नियुक्ती झाल्यानंतर राम कुलकर्णी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात गोपीनाथ गडावर नतमस्तक होत आशीर्वाद घेऊन केली. यानंतर परळी शहरात आगमन होताच भाजपाच्या वतीने त्यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.
प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कुलकर्णी हे इंदौर येथे पक्षाच्या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी सकाळी गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “गोपीनाथराव मुंडे यांचे माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० वर्षे काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. गोपीनाथ गडावर आल्यानंतर सकारात्मक दृष्टिकोनाने काम करण्यासाठी नवे बळ मिळते.”
दरम्यान, परळीत आगमन झाल्यानंतर तालुका अध्यक्ष राजेश गीते यांच्या जनसंपर्क कार्यालयात कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव (अण्णा) गुट्टे यांनी, “राम कुलकर्णी हे हाडाचे कार्यकर्ते असून त्यांनी संघर्षातून संघटनेत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांना उज्ज्वल भविष्य आहे,” असे मत व्यक्त केले.
तालुका अध्यक्ष राजेश गीते यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “रामभाऊंच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. तसेच नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वासाठीही त्यांची लेखणी प्रभावीपणे काम करत आहे.”
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शिवाजी (अण्णा) गुट्टे, तालुका अध्यक्ष राजेश गीते, माजी पंचायत समिती सदस्य मारोतराव फड, भाजपा सचिव अनिल गुट्टे, सेलूचे सरपंच बाळासाहेब फड, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष धुराजी साबळे, प्रा. रविकांत कराड, गणेश होळंबे, केशव गीते आदी उपस्थित होते.
याच प्रसंगी अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती नारायणराव केंद्रे व ज्येष्ठ नेते अशोकराव केंद्रे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच ‘रामा टायर्स’च्या वतीने बाळासाहेब गीते यांनीही कुलकर्णी यांचा सन्मान केला.


Categories

Recent Posts