Breaking

दुचाकी दुरुस्तीच्या विलंबावरून गॅरेजवर राडा; लोखंडी वाटीने हल्ला

Updated: एप्रिल 13, 2026

By Vivek Sindhu

दुचाकी दुरुस्तीच्या विलंबावरून गॅरेजवर राडा; लोखंडी वाटीने हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: मोटार सायकल दुरुस्त करण्यास उशीर का झाला, यावरून गॅरेज मालकाने फिर्यादीला लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे घडली आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश रामधन गिराम (वय ४५) यांनी आपली दुचाकी तुकाराम गोविंद सपकाळ यांच्या गॅरेजवर दुरुस्तीसाठी दिली होती. ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रमेश गॅरेजवर गेले असता, दुचाकी अजून का दुरुस्त केली नाही, अशी विचारणा त्यांनी केली. याचा राग आल्याने आरोपी तुकाराम सपकाळ आणि सिद्धांत तुकाराम सपकाळ यांनी त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. आरोपी सिद्धांतने गॅरेजमधील मॅग्नेट कॉईलच्या लोखंडी वाटीने रमेश यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर जोराने मारले, ज्यामुळे ते जखमी झाले. पोलीस हवालदार खाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts