Breaking

माजलगाव तालुक्यात घरफोडी; ७० हजारांचे दागिने आणि रोकड चोरीला

Updated: एप्रिल 13, 2026

By Vivek Sindhu

७० हजारांचे दागिने आणि रोकड चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: तालुक्यातील रामनगर तांडा येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना ११ एप्रिलच्या रात्री घडली असून याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविता गोविंद राठोड (वय ३५, रा. रामनगर तांडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या लोखंडी कपाटाचे दार उपसून कपाटातील मेकअपच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच पर्समधील ६,००० रुपये रोख, असा एकूण ६९,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सविता या घरी नसताना ही चोरी झाली. सकाळी ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. सहाय्यक फौजदार बळवंते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts