Breaking

नागझरी परिसरात आ. नमिता मुंदडा यांच्या निधीतून सभामंडपाचे थाटात भूमिपूजन

Updated: एप्रिल 13, 2026

By Vivek Sindhu

नागझरी परिसरात आ. नमिता मुंदडा यांच्या निधीतून सभामंडपाचे थाटात भूमिपूजन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील सारनाथ नगर, नागझरी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आणि जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित एका विशेष सोहळ्यात आज नव्या सभामंडपाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या आमदार निधीतून या सभामंडपाचे काम पूर्णत्वास येणार आहे. युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते या कार्याची अधिकृत पायाभरणी करण्यात आली असून, सामाजिक कार्यक्रमांसाठी हक्काची वास्तू उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, हा सभामंडप परिसरातील नागरिकांच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या वास्तूमुळे सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होणार असून विकासकामांच्या माध्यमातून जनसेवा करणे हेच आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, या सभामंडपासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप मस्के यांनी प्रतिष्ठानच्या मालकीची जागा शासनाच्या नावे करून उपलब्ध करून दिली आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत रोडे, शेपवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विष्णू तात्या शेप, उपसरपंच बालासाहेब शेप, माजी जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब दोडतले आणि माजी नगराध्यक्ष महादू मस्के उपस्थित होते. तसेच ग्राम विस्तार अधिकारी खरात, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, स्थानिक पत्रकार, महिला मंडळाचे पदाधिकारी आणि जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जिगेश इंगळे यांनी केले.


Categories

Recent Posts