Breaking

केजमध्ये ग्राम महसूल अधिकारी अडकला लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात

Updated: एप्रिल 8, 2026

By Vivek Sindhu

वारसाचा फेर घेण्यासाठी मागितली ३९ हजाराची लाच

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वारसाचा फेर घेण्यासाठी मागितली ३९ हजाराची लाच 

केज :- वारसांच्या फेरसाठी ग्राम महसूल अधिकारी महोदयांनी ३९ हजाराची लाच शेतकऱ्याकडे माहिती त्या नंतर तडजोडी अंती ३५ हजार रु देण्याचे कबुल झाल्या नंतर ९ हजार रु. ची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथील ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकला.

केज तालुक्यात दहिफळ वडमाउली सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर राऊत यांनी पिराची वाडी तालुका केज येथील शेतकऱ्याचा वारसाचा फेर घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ३९ हजाराची लाच मागितली. तडजोडी अंती त्यांच्या ३५ हजार रन देण्याचे कबुल झाले. मात्र शेतकऱ्याला ग्राम महसूल अधिकाऱ्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. 

त्या नंतर दि. ८ एप्रिल रोजी दहिफळ वडमाउली येथे दुपारी ५ हजार रु. ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस उपाधिक्षक सोपान चित्तमपल्ले, पोलिस निरीक्षक बीडकर, सुरवसे, पुरी हे सहभागी झाले होते.

देशादेवतून निवृत्त झाल्या नंतर करीत होते महसूल विभागात नोकरी लागताच अब्रु वेशीला 

लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात रंगेहात अडकलेले ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर जाधव हे पूर्वी संरक्षण सेवेत होते. संरक्षण सेवेतून निवृत्त झाल्या नंतर त्यांना महसूल विभागात ग्राम महसुल अधिकारी म्हणून नोकरी लागली होती. परंतु देशसेवा केल्या जो प्रामाणिपपणा असतो. महसूल सेवेत रुजू होताच त्यांनी अब्रु खुंटीला टांगून ठेवली.


Categories

Recent Posts