Breaking

बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Updated: एप्रिल 8, 2026

By Vivek Sindhu

बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: शहरातील नगर रोड परिसरातील लोकाशा नगर येथे माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बुधवार, ८ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. बाळकृष्ण जायभाय असे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. एका कार्यरत पोलिसानेच आत्महत्या केल्याने शहरात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण जायभाय हे नगर रोडवरील समर्थ मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या लोकाशा नगर परिसरात वास्तव्यास होते. बुधवारी त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस या आत्महत्येमागील कारणांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

बाळकृष्ण जायभाय हे पोलीस दलामध्ये अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. सध्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असण्यापूर्वी त्यांनी बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि गेवराई पोलीस ठाण्यातही उत्तम प्रकारे आपली सेवा बजावली होती. त्यांच्या या प्रदीर्घ आणि उत्कृष्ट सेवेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. एका हसतमुख आणि शिस्तबद्ध पोलीस कर्मचाऱ्याने अचानक आत्महत्या केल्याने पोलीस दलासह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts