Breaking
Updated: एप्रिल 7, 2026
भावकीतील वादातून तरुणाचा हात मोडला; ६ जणांविरुद्ध गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: केज तालुक्यातील जवळवन येथे जुन्या वादातून सहा जणांनी मिळून एका तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. राहुल बापुराव नकाते या ३९ वर्षीय शेतकऱ्याने याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ही घटना राहुल यांच्या शेतात घडली.
आरोपी आकाश दीपक भवर, रोहन रवी भवर, विशाल रवी भवर, गणेश शिवाजी भवर, स्वरूप गणेश भवर आणि मीरा रवी भवर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून राहुल यांना गाठले. “माझ्याशी का भांडला?” असे म्हणत आरोपींनी लाकडी काठ्यांनी राहुलच्या डोक्यात, पाठीवर आणि कमरेवर मारहाण केली, ज्यात त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. फिर्यादीची आई आणि पत्नी भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. पोलीस हवालदार गित्ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.