Breaking

शेतात झोपलेल्या शेतकऱ्याला काठीने मारहाण

Updated: एप्रिल 7, 2026

By Vivek Sindhu

शेतात झोपलेल्या शेतकऱ्याला काठीने मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील मंगाईवाडी येथील एका शेतकऱ्याला शेतात झोपलेले असताना काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. माणिक तुकाराम गहने या ४० वर्षीय शेतकऱ्याने याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना सटवाई वडा येल्डा शिवारात घडली.

फिर्यादी आणि साक्षीदार शेतात झोपलेले असताना आरोपींनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी क्रमांक १ याने लाकडी काठीने माणिक यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर मारून जखमी केले, तर आरोपी क्रमांक २ याने पाठीवर मुक्कामार देऊन जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार भागवत अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts