Breaking
Updated: एप्रिल 7, 2026
विजेचे खांब आणि संरक्षक जाळ्या झाल्या भुईसपाट
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज- कळंब रोडवर साळेगाव येथील बस स्टँडवर ११:१५ रात्री वा. च्या सुमारास एक डिझेल टँकर दुभाजकाला धडकून अपघात झाला आहे. यात दुभाजकावर असलेली विजेचे खांब आणि जाळ्या भुईसपाट होवून टँकरचे नुकसान झाले.
दि. ६ एप्रिल रोजी रात्री १११५ वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून निघालेले डिझेलचे टँकर क्र. (एम एच २३/ए यू ४८६३) हे तेलगावाकडे जात असताना साळेगाव येथील रस्त्यावर असलेले दुभाजक न दिसल्यामुळे अचानक भरधाव वेगात असलेल्या टँकरच्या चालकाला दिसले नसल्याने टँकर रस्ते दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबाला धडकून खांब मोडला. तसेच दुभाजक वरच्या संरक्षक जाळ्या भुईसपाट झाल्या. या अपघातात डिझेल टँकरचे आणि दुभाजकाचे मोठे नुकसान झाले आहे. टँकर चालक बळीराम देशमुख (रा. कन्नापूर ता. परळी) मात्र अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
टँकर रिकामे होते म्हणून अनर्थ टळला :- अपघातग्रस्त टँकर रिकामे असल्याने सुदैवाने अनर्थ टळला अन्यथा टँकर पेट घेण्याची भीती होती. तसेच शेजारी घरे होती.
माहिती मिळताच पोलिस तत्काळ हजर झाले :- अपघाताची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले गस्तीवर हाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरगोजे आणि पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंभू देव दराडे हे हजर होऊन त्यांनी रस्त्यावरील वाहन आणि अडथळे दूर केले.
मेगाचा गलथानपणा :- या महामार्गाचे काम करीत मेगा इंजिनिअर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कं. मर्या यांनी या महामार्गावर गावाजवळ रस्ते दुभाजकाच्या ठिकाणी दुभाजक असल्याची माहिती दर्शविणारे फलक किंवा रात्री वाहनचालक यांचे लक्ष वेधण्यासाठी पिवळ्या पट्ट्या आणि इंडिकेटर्स लावले नसल्याने अनेक अपघात होत आहेत.
मेगा वर सुद्धा गुन्हे दाखल करणे आवश्यक :- मेगा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर अपघात झाल्यास कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्या विरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हे दाखल केल्या शिवाय ते दक्षता घेणार नाहीत.