Breaking
Updated: एप्रिल 3, 2026
सांगवी शिवारात तरुणाचा अपघाती मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: बीड ते अहिल्यानगर रोडवर सांगवी शिवारात एका भरधाव कारने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वासुदेव गहिनीनाथ बनवे (रा. बावी, ता. आष्टी) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना ३० मार्च रोजी दुपारी राजश्री लॉन्ससमोर घडली. भाऊसाहेब रामकिसन बनवे यांनी याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वासुदेव बनवे हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 23 VJ 3412) जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने (क्रमांक MH 20 CS 3092) त्यांना भीषण धडक दिली. कारचा वेग इतका जास्त होता की वासुदेव यांचा या अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार चांदमारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.