Breaking
Updated: एप्रिल 3, 2026
भावकीतील वादातून तरुणाचा हात मोडला; ६ जणांविरुद्ध गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: तुझे घर आमच्या हद्दीत आले आहे, असे म्हणत मांडवा येथे जुन्या वादातून एका लहान मुलाच्या कपाळावर दगड मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. लिवा बबन भोसले (वय ३५, रा. मांडवा) यांनी याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून त्यांच्यात जागेवरून वाद सुरू होता.
आरोपी धनु उर्फ धनंजय बबन भोसले याने लिवा यांच्या मुलाला, नूतनला, उजव्या बाजूच्या कपाळावर दगड मारून जखमी केले. यावेळी आरोपी सोनी भोसले आणि मिजाजबाई भोसले यांनी फिर्यादीच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपींनी संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. आष्टी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक मुद्दे या घटनेचा तपास करत आहेत.