Breaking

माजलगावच्या पिंपळगावमध्ये तरुणावर कटरने वार

Updated: एप्रिल 3, 2026

By Vivek Sindhu

हायवा अडवून चालकाला बेदम मारहाण; गाडीची मोडतोड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: माजलगाव तालुक्यातील नाखले पिंपळगाव येथे विनाकारण शिवीगाळ करून एका तरुणावर कटरने हल्ला करण्यात आला आणि त्याच्याकडील रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. अविनाश प्रभाकर गायकवाड (वय १९, रा. नाखले पिंपळगाव) यांनी याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ३१ मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली.

आरोपी कुंदन रमेशवर लोंढे आणि प्रेम रामेश्वर लोंढे यांनी फिर्यादीला विनाकारण अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपी कुंदन याने त्याच्या हातातील कडे आणि कटरने अविनाशच्या डोक्यात उजव्या बाजूला कपाळाजवळ वार करून त्याला जखमी केले. यावेळी प्रेम लोंढे याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी अविनाशच्या खिशातील १२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि तिथून पळ काढला. पोलीस सहाय्यक फौजदार मोमीन या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts