Breaking

ग्रामीण भागात चहाचा कप महागला !

Updated: एप्रिल 2, 2026

By Vivek Sindhu

ग्राहकांना बसला युद्धाचा फटका

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाच रु. वरून थेट दहा रु. झाली दुप्पट भाववाढ 

केज :- चहाच्या घोटाला आणि कुंकवाच्या बोटाला कधी नाही म्हणू नये. अशी चहाची महती सांगणारी आणि त्याचा संबंध सौभाग्याचा लेणे असलेल्या कुंकवाच्या सोबत जोडणारी आधुनिक म्हण प्रचलित झाली आहे. मित्र किंवा पै पाहुणा घरी आल्या नंतर त्याची ऊठबस आणि सरबराईची सुरुवात प्रथम चहा पासूनच होती. त्या चहाला मात्र आता आखाती युद्धाचा फटका बसला असून पूर्वी ग्रामीण भागात पाच तुला मिळणारा चहा आता थेट दहा रु. वर पोहोचला आहे.

साळेगाव तालुका केज हे केज तालुक्यातील आठवडे जनावरांचा बाजार भरत असलेले बाजारपेठेचे गाव आहे. साळेगावच्या बस स्टँडवर चहा व नाश्त्याचे सुमारे सहा हॉटेल्स आहेत. पूर्वी येथील सर्वच हॉटेल्समध्ये अगदी माफक अशा पाच रु. चहा मिळत होता. परंतु इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचे युद्ध चालू झाल्याने त्यांचा परिणाम स्वयंपाकाचा गॅस, डिझेल आणि पेट्रोल यांचे दर वाढले असल्याने साळेगाव येथील सर्व हॉटेल्स चालकांनी एक बैठक घेतली आहे. २ एप्रिल पासून आता पूर्वी पाच रु. मध्ये मिळणारा चहा आता थेट दहा रु.वर पोहोचला आहे.

____________________________________

ग्राहकात नाराजी मात्र पुन्हा सर्व सुरळीत होईल :- 

अचानक चहाच्या झालेल्या दुप्पट भाववाढी मुळे ग्राहक वर्गात नाराजी आहे. त्यामुळे आता चहा पिण्यासाठी हॉटेलवर गेल्यास याचा विचार करावा लागेल. — सय्यद अकबर पटेल

____________________________________

आमचा नावीलाज आहे ! :– 

कमर्शियल गॅसचे भाव वाढल्याने पर्यायाने त्याचा परिणाम आमच्या धंद्यावर होत असल्याने आम्ही सर्व हॉटेल चालकांना आता पाच रु. ऐवजी दहा रु. ला चहा विक्रीचा निर्णय घ्यावा लागला.

         —- पोपट लांडगे, हॉटेल चालक


Categories

Recent Posts