Breaking

दीनदयाळ नागरी सहकारी बँकेस 31 मार्च 2026 अखेर 2 कोटी 05 लाखांचा नक्त नफा

Updated: एप्रिल 2, 2026

By Vivek Sindhu

दीनदयाळ नागरी सहकारी बँकेस 31 मार्च 2026 अखेर 2 कोटी 05 लाखांचा नक्त नफा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – विश्वास, विकास आणि विनम्रता या त्रिसुत्रीनुसार कार्यरत असलेली दीनदयाळ नागरी सहकारी बँक मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात मागील 29 वर्षांत नांवारूपास आली आहे. आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगतीकडे वाटचाल करणारी बँक म्हणून ही आज दीनदयाळ बँकेकडे पाहिले जाते. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदु मानून समाजाच्या सर्वच क्षेञात आर्थिकदृष्ट्या संपन्नता आणण्यासाठी दीनदयाळ बँक कटीबध्द आहे. आर्थिक क्षेञात आश्वासक व दमदार पाऊले टाकणाऱ्या दीनदयाळ बँकेला 31 मार्च 2026 अखेर 2 कोटी 05 लाख रूपयांहून अधिकचा नक्त नफा झाला आहे. लवकरच बँक रूपये 1000 कोटी एवढा एकूण व्यवसायाचा टप्पा पूर्ण करणार आहे. अशी माहिती दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

दीनदयाळ बँकेची 31 मार्च 2026 (आर्थिक वर्ष 2025 – 2026) अखेर आर्थिक वर्षासाठीचे अलेखापरीक्षीत आर्थिक परिणाम सांख्यिकीय माहिती पुढीलप्रमाणे आहे (कंसातील सर्व नमुद आकडे हे कोटीत आहेत.) एकूण संकलित ठेवी (609.83), एकूण वितरीत कर्जे (346.65), सी.डी.रेषो (56.84), बँकेने एकूण (956) एवढा व्यवसाय केला आहे. तर बँकेस तब्बल 2 कोटी 05 लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. तर अनुत्पादक कर्जे (नेट एनपीए) चे प्रमाण 0.64 टक्के एवढे आहे. (ता.क. – वार्षिक लेखा विवरण असल्याने उपरोक्त आकडेवारीत लेखापरीक्षणाप्रमाणे अंशतः बदल संभवतो.) दीनदयाळ बँकेचे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र आहे. तसेच बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 18 एवढ्या शाखा कार्यरत असून अंबाजोगाई येथे बँकेचे अद्ययावत मुख्य कार्यालय हे स्वत:च्या मालकीच्या भव्य इमारती मध्ये कार्यरत आहे. बँकेच्या वतीने प्रतिवर्षी युगपुरूष स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. मागील 24 वर्षांपासून राज्यातील व राज्याबाहेरील अनेक नामवंतांनी आपल्या अमोघ वाणीने अंबाजोगाईकरांना, ज्ञान, अध्यात्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक मेजवानी दिलेली आहे. याआधी वृक्षारोपण तसेच पाणी टंचाईच्या काळात बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून बंधारा बांधला आहे. मुक्या जनावरांसाठी बँकेच्या वतीने पाणपोईची सुविधा करण्यात आलेली होती. मागील काही वर्षांत बँकेच्या मुख्यालयास सुप्रसिद्ध समाजसेवक, आर्थिक व व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार, शिक्षण तज्ज्ञ, सिने व नाट्य कलावंत, लेखक, व्याख्याते, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती, आर.बी.आय.चे वरीष्ठ अधिकारी या मान्यवरांनी वेळोवेळी बँकेस भेटी देवून आपले अभिप्राय नोंदविले आहेत. कोविड सारख्या संकटकाळात तसेच सर्व ग्राहकांना सातत्यपूर्ण दर्जेदार व तत्पर बँकिंग सेवा दिल्याबद्दल ग्राहकांच्या वतीने बँकेस वेळोवेळी लेखी प्रशंसा व गौरवपत्र प्राप्त झालेले आहेत. तसेच दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात 2023 साली मानाचा तुरा रोवला गेला आहे. तो म्हणजे बॅंकेच्या सर्वांगिण कार्याची दखल घेऊन सलग दुसऱ्या वर्षी 400 ते 500 कोटी रूपयांच्या ठेवी जमविलेल्या गटात दीनदयाळ बँकेस बँको ब्ल्यू रिबन या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने यापूर्वी गौरविण्यात आले आहे. गतवर्षी 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून समाजाप्रती सामाजिक उत्तरदायित्व आणि रक्ताची कमतरता भरून काढणे यासाठी बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे तर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून परळी वेस (अंबाजोगाई) या ठिकाणी कॅन्सर निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बँकेने नेहमीच सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचा विश्वास संपादन केला आहे. तत्पर व दर्जेदार बँकींग सेवा, सुविधा उपलब्ध करून देत दीनदयाळ बँकेने सहकार क्षेत्रात बिना संस्कार, नही सहकार हा संस्कार जोपासला आहे. एक परिवार म्हणून काम करताना विश्वास, विकास आणि विनम्रता हे ब्रीद घेऊन आश्वासक प्रगती साधली आहे. सध्या बँकेच्या मराठवाड्यात अंबाजोगाई, माजलगाव, परळी वैजेनाथ., पालम, परळी रोड, नांदेड, उदगीर, लातूर, देगलूर, परतूर, धारूर, नायगांव बाजार, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहमदपूर, जालना, बीड, सोनपेठ या ठिकाणी शाखा असून सुरूवाती पासूनच सामाजिक बांधिलकी मानून ही बँक आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहे. संपूर्ण संगणकीकृत बँकींग सेवा दीनदयाळ बँक पुरविते, रूपे ए.टी.एम.ची तथा युपीआयची सेवा ही उपलब्ध आहे. बँकेच्या ए.टी.एम.मशीन मध्ये इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे ए.टी.एम.कार्ड वापरता येतात. बँकेच्या सर्वांगीण विकासात बँकेच्या संचालिका तथा महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल या खात्याच्या सन्माननीय कॅबिनेट मंत्री महोदया ना.सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तर संचालक राजाराम धाट, संचालिका सौ.शरयूताई हेबाळकर, सर्व संचालक श्री.विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, इंजि.बिपीन क्षीरसागर, प्राचार्य किसन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक भिमा ताम्हाणे, ऍड.अशोक कुलकर्णी व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश शेळके यांचे तसेच आर.बी.आय.,सहकार खात्याचे आयुक्त, तथा निबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक तसेच बँकेचे सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, हितचिंतक आदींचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असल्याची माहिती दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दीनदयाळ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश उत्तमराव शेळके म्हणाले की, 31 मार्च 2026 अखेर प्रत्येक बँकरला उत्कंठा असते ती अंतिम आर्थिक निकालाची वर्ष आलं तसं जात असतं. परंतू, वर्षभरात केलेल्या प्रयत्नांचे जणू उत्तरच मिळावे. तो आनंद, ते समाधान आणि नव्या आर्थिक वर्षाची नांदी, अशा संमिश्र भावनांची गर्दी मनात होते. पण, या भावनाच मनाला निश्चितच उभारी देऊन जातात. एप्रिल – 2025 पासून ते मार्च – 2026 पर्यंतचा कालावधी हा सर्वार्थाने नफा – तोटा पत्रकावर परिणाम करणारा होता, आपण सर्वजण हे जाणताच, त्यातही यावर्षी प्रामुख्याने ठराविक महिन्यांचा कार्यकाळ, तशातच अनेक अडचणी हे सर्व असताना ही प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीची अनुभूती यावी व टीम-वर्क काय असते त्याचे उत्तर मिळावे. तसेच मा.संचालक मंडळाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांचे टीमवर्क, संस्थेविषयीचे प्रेम व निष्ठा. खातेदारांचा उत्साह, सभासदांचे योगदान आहे. यामुळेच की, काय बाजारपेठेतील चढ-उतार या मंदीच्या कालावधीत ही बँकेने चांगला परफॉर्मन्स केला आहे. अर्थातच हे सर्व सांगण्यामागचे प्रयोजन अभिनंदन करावे हेच आहे. या सर्व अडचणींतून मार्ग काढत आमचे सहकारी, शाखाधिकारी ते सर्व शिपाई व मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व सहकारी यांचे सामुहिक प्रयास, योगदान हे या आर्थिक निकालाचे मानकरी आहेत. हे येथे निश्चितच उल्लेखनीय होय. संस्थेचा उत्कर्ष हे उद्दिष्ट समोर ठेवून सातत्याने प्रयत्नरत असावे, हा आपल्या कार्यामागील प्रपंच असावा. नव्हे तोच आपल्या कार्याचा मुख्य आधार असावा. सर्वांचे हार्दिक अभिनंदन व बँकेसाठी पुढील आर्थिक वर्ष 2026 – 2027 हे ही उत्कृष्ट निकालाचे वर्षे ठरावे यासाठी मनस्वी शुभेच्छा..!


Categories

Recent Posts