Breaking

केस मागे घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला; स्टील रॉडने डोक्यात केली मारहाण

Updated: एप्रिल 1, 2026

By Vivek Sindhu

स्टील रॉडने डोक्यात केली मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर जुन्या वादातून आणि दाखल असलेली केस मागे घेण्यासाठी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी माऊलीनगर परिसरात असलेल्या महादेव मंदिराजवळ घडली. दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ असे जखमी तरुणाचे नाव असून, तो आपल्या घराकडे पायी जात असताना आरोपींनी त्याला वाटेत अडवले.

या प्रकरणात पोलिसांनी दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ आणि महादेव नारायण जाधव या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीला बुलेट आडवी लावून आधी शिवीगाळ केली आणि त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने स्टील रॉडने डोक्यावर, खांद्यावर आणि पाठीवर गंभीर वार केले. या हल्ल्यात फिर्यादीच्या भुवयावरही गंभीर जखम झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.


Categories

Recent Posts