Breaking
Updated: एप्रिल 1, 2026
कोयता आणि रॉडने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: तालुक्यातील धोंडराई येथे सोशल मीडियावरील वादातून तरुणांच्या दोन गटात मोठी हाणामारी झाली आहे. इन्स्टाग्राम ग्रुपवर शिवीगाळ केल्याचा आरोप करत आरोपींनी फिर्यादी संदीप कैलास कोकणे आणि त्यांच्या मित्रांवर लोखंडी रॉड, कोयता आणि काठ्यांनी हल्ला केला. ही घटना २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी घडली असून याप्रकरणी सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी संदीप पंढरी प्रधान, रोहित अशोक प्रधान, तेजस लक्ष्मण प्रधान, देविदास लक्ष्मण प्रधान, बाळा प्रकाश प्रधान, संदीप राम प्रधान आणि पंढरी मधुकर प्रधान यांना आरोपी केले आहे. आरोपींनी फिर्यादीला ‘तुम्ही इन्स्टाग्रामवर आम्हाला शिव्या का दिल्या?’ असे विचारत मारहाण सुरू केली. यामध्ये फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.