Breaking

जिल्हयासाठी 3 स्थानिक सुट्टया जाहिर

Updated: एप्रिल 1, 2026

By Vivek Sindhu

जिल्हयासाठी 3 स्थानिक सुट्टया जाहिर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – जिल्हाधिकारी बीड यांच्या अधिकारात असणा-या वर्षातील 3 स्थानिक सुट्टयांबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार चालु वर्षात 31 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी तिस-या श्रावणी सोमवारी पहिली  स्थानिक सुट्टी असणार आहे.

            ज्येष्ठगौरी पूजन शुक्रवार दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी दुसरी स्थानिक सुटी असेल. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशी निमित्ताने जिल्हयासाठी तिसरी स्थानिक सुटी असेल.

      या तीन सुटया जिल्हयातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, नगर परिषद कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, कोषागार आणि उपकोषागार कार्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांसाठी आहेत.

            जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना ही सुटी लागू राहणार नाही.


Categories

Recent Posts