Breaking
Updated: मार्च 31, 2026
ढोबळी मिरचीला भाव नसल्याने पिकात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज तालुक्यात एका शेतकऱ्याने मोठ्या आशेने आपल्या शेतात ढोबळी मिरचीची लागवड केली पण आखाती युद्धाचे परिणाम शेत मालावर जाणवू लागल्याने त्याने शेतात शेळ्या मेंढ्या सोडल्या आहेत.
केवड तालुका केज येथे शिवारात एका देशमुख नावाच्या शेतकऱ्याने सुमारे पाच एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीची लागवड केली. बाजारात ढोबळ्या मिरचीला चांगली मागणी आणि भाव असल्याने तसेच त्यांनी रात्रंदिवस राबून मेहनत करून चांगले पिक आणले पण इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे भाजीपाला, फळभाज्या व शेतमालाचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे बहारदार आलेले ढोबळी मिरचीचे पिकाची तोडणी सुद्धा परवडत नसल्याने शेतकऱ्याने चक्क ढोबळी मिरचीच्या पिकात आता शेळ्या मेंढ्या सोडल्या आहेत.