Breaking
Updated: मार्च 28, 2026
जुन्या वादातून कोयत्याने वार; पातरुड जवळ तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: “मी तुला मारणारच आहे,” अशी धमकी देत एका तरुणाने आपल्याच गावातील व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना माजलगाव-बीड रोडवरील मुंडे पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला.
अकबर अहमद शेख (वय ३५, रा. पातरुड) हे गुरुवारी दुपारी आपल्या घरी जात असताना ही घटना घडली. आरोपी जावेद दिवाण पठाण (रा. पातरुड) हा दुचाकीवरून आला आणि त्याने अकबर यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “आपले भांडण मिटले आहे, मग तू मला का मारणार आहेस?” अशी विचारणा अकबर यांनी केली असता, संतापलेल्या जावेदने आपल्या जवळील कोयता काढून अकबर यांच्या डोक्यात मारला.
या हल्ल्यात अकबर शेख गंभीर जखमी झाले असून आरोपीने त्यांना आपल्या नातेवाईकांची भीती दाखवत पुन्हा मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. अकबर शेख यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी जावेद पठाण विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.