Breaking
Updated: मार्च 26, 2026
वीज उपकेंद्रा समोर उभी केलेली ऑपरेटरची मोटार सायकलची चोरीला गेली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज तालुक्यातील साळेगाव येथील वीज उपकेंद्रात कार्यरत असलेल्या ऑपरेटरची मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
साळेगाव ता. केज येथील वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून काम करीत असलेले मधुकर शिवाजी भोसले यांची दि. २३ मार्च रोजी रात्रपाळी कर्तव्यावर असताना त्यांची काळया रंगाची टीव्हीएस व्हिक्टर मोटार सायकल क्र. (एम एच-१६/ पी-०६४४) ही हॅण्डल लॉक करून उभी केली होती. रात्री ३:०० वा. च्या सुमारास बाहेर अंधार दिसला म्हणून त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांची मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांची मोटार सायकल आढळून आली नाही.
ऑपरेटर मधुकर भोसले यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १५७/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस जमादार तुकाराम मुरकुटे हे तपास करीत आहेत.