Breaking
Updated: मार्च 26, 2026
इंस्टाग्राम वरून महिलेस अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- ३१ वर्षीय महिलेला वेगवेगळ्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ पाठवून आणि फोन वरून धमकावून तिचा विनय भंग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज शहरातील एका ३१ वर्षीय महिलेला तिच्या इंस्टाग्रामवर धाराशिव जिल्हातील कळंब येथील ओंकार सुंदर भंडारे याने २८ फेब्रुवारी ते २६ मार्च दरम्यान वेगवेगळ्या अकाऊंट वरून स्त्री वर्गास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये करून बदनामी केली. या बाबत महिलेने आरोपी ओंकार भंडारे याच्या मोबाईलवर फोन करून बदनामी करू नको. अशी समज दिली असता, त्याने तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी ओंकार भंडारे याच्या विरुद्ध सदर महिलेने दिलेल्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १५७/२०२६ भा. न्या. सं. ८९, ३५६(२), ३५१(१), ३५२
नुसार दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल नागरगोजे हे तपास करीत आहेत.