Breaking
Updated: मार्च 26, 2026
दिव्यांग व्यक्तीने केली धडधाकट व्यक्तीला कुबडीने मारहाण : तिघा विरुद्ध गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- एका दिव्यांगाने पैशाच्या कारणावरून हातातील लोखंडी कुबड्याने एका धडधाकट व्यक्तीला मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर केल्या प्रकरणी त्याच्या दोन मुलासह तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील खय्यूम दस्तगीर शेख याने मागील वर्षी त्यांचा गावातील सुखदेव देविदास राऊत यांच्याकडून हाताउसने पैसे घेतले होते. ते पैसे त्याने मागील सहा महिन्यापूर्वी परत दिले.
दरम्यान खय्यूम दस्तगीर शेख हे दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास गावातील नागबेट चौकातील एका टपरी समोर बसले होते. त्या वेळी सुखदेव राऊत तिथे आला आणि त्यांना पैशाची मागणी करू लागला. त्यावेळी खय्यूम त्याला म्हणाले की, तुमचे पैसे परत दिले आहेत. ते लक्षात नाही का ? असे म्हणताच सुखदेव राऊत याने त्यांना शिवीगाळ केली आणि त्याच्या हातातील लोखंडी कुबडीने खय्यूम यास मारहाण केली. त्या नंतर तिथे सोनू राऊत व भैय्या राऊत ही दोन मुले आणि त्यांनीही खय्यूम यास काठीने मारहाण केली.
या मारहाणीत खय्यूम यांच्या खांद्याला मार लागून फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोळ्यावर आणि हातावर मुका मार लागला आहे.
खय्यूम शेख यांनी अंबाजोगाई येथे उपचार घेतल्या नंतर केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून सुखदेव राऊत आणि सोनू राऊत व भैय्या राऊत या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. १५६/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ११८(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे तपास करीत आहेत.