Breaking

मानमोडी येथे घरफोडी; १.१५ लाखांचा ऐवज लंपास

Updated: मार्च 25, 2026

By Vivek Sindhu

मानमोडी येथे घरफोडी; १.१५ लाखांचा ऐवज लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: तालुक्यातील मानमोडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे १ लाख १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये लग्नातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे.

तानाजी देवराव येवले (वय ५१, रा. मानमोडी) यांनी याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २४ मार्चच्या रात्री येवले कुटुंब घरी नसताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आणि त्यांचे भाऊ मधुकर येवले यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे झुंबर, सोन्याची अंगठी आणि सोन्याचे ४० मणी असा सुमारे ३५ हजार ८०० रुपयांचे दागिने लंपास केले.

दागिन्यांसोबतच चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ८० हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाचे आधारकार्ड देखील चोरून नेले आहे. एकूण १ लाख १५ हजार ८०० रुपयांचा हा माल चोरीला गेला आहे. या घरफोडीमुळे मानमोडी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेवराई पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार नवले या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts