Breaking
Updated: मार्च 25, 2026
हा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चौसाळा येथील एका व्यापाऱ्यावर सहा जणांनी सशस्त्र हल्ला करून रोकड आणि सोन्याची साखळी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विकास छत्रभुज औताडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.विकास छत्रभुज औताडे (वय ४५, रा. चौसाळा) यांचे गावात ‘करण ट्रेडर्स’ नावाचे आडत दुकान आहे. २१ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते आपल्या दुकानात असताना एका राखाडी रंगाच्या स्विफ्ट कारमधून सहा मास्कधारी हल्लेखोर तिथे पोहोचले. त्यांच्या हातात हॉकी स्टिक, लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड होते. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी विकास औताडे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी चैतन्य उमाकांत जोगदंड याने ‘याने आपल्या वडिलांना मारले आहे’ असे म्हणून चिथावणी दिली.मारहाणीदरम्यान आरोपी दिग्विजय उर्फ बॉबी उमाकांत जोगदंड याने विकास यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी बळजबरीने तोडून घेतली. याच वेळी त्यांच्या इतर साथीदारांनी दुकानाच्या काउंटरमधील सुमारे साडेचार लाख रुपये रोख चोरून नेले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील लंपास केला. जाताना आरोपींनी दुकानावर दगडफेक केली, ज्यामध्ये औताडे यांना दुखापत झाली आणि दुकानाच्या केबिनचे नुकसान झाले. या हल्ल्यात चैतन्य जोगदंड, दिग्विजय जोगदंड आणि इतर चार अनोळखी इसमांचा समावेश आहे.या गंभीर घटनेनंतर जखमी व्यापाऱ्याला उपचारासाठी बीड येथील महावीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोविंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन सुभाष मुरुमकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.