Breaking

तात्काळ राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे रुपाली चाकणकरांना आदेश

Updated: मार्च 20, 2026

By Vivek Sindhu

तात्काळ राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे रुपाली चाकणकरांना आदेश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मुंबई : अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर चाकणकरांवर टीकेचा भडीमार झाला होता. विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. आता रुपाली चाकणकरांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला होता. रुपाली चाकणकरांनी आधी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत चर्चा केली.


Categories

Recent Posts