Breaking
Updated: मार्च 20, 2026
नांदूरघाट येथे सोरट जुगार चालकास पकडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – नांदूरघाट (ता. केज) येथील बाजारतळावर बापु सरदार शिंदे हा सोरट नावाचा जुगार चित्रावर पैसे लावून लोकांकडून खेळवित व खेळत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, जमादार राजू वंजारे, होमगार्ड ढाकणे यांच्या पथकाने १९ मार्च रोजी दुपारी २.४० वाजता छापा मारला. त्यास सोरट नावाचा जुगार स्वतःचे फायद्यासाठी चित्रावर पैसे लावून खेळत व खेळवीत असताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडील सोरट जुगाराचे साहित्य, एक हजार ७९० रुपये व चार हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला. बापू शिंदे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फौजदार अशोक सोनवणे तपास करताहेत.