Breaking

केज पोलिसांचे पथसंचलन 

Updated: मार्च 20, 2026

By Vivek Sindhu

केज पोलिसांचे पथसंचलन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केज पोलिसानी शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या नेतृत्वात पथसंचलन केले.

दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ६:०० केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केज शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करण्यात आले. पोलिस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कानडी चौक, बस स्टँड, भवानी चौक, मंगळवार पेठ कॉर्नर, मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, नगर पंचायत, रोजा मोहल्ला, बडी मस्जिद, स्टेट बँक ऑफ इंडिया या प्रमुख मार्गावरून शस्त्रसज्ज पोलिस, दंगल नियंत्रक कमांडोच्या वेशातील पोलिस, गृह रक्षक दलाचे जवान यांनी पथसंचलन केले.

या पथसंचना मध्ये मध्ये पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.


Categories

Recent Posts