Breaking
Updated: मार्च 18, 2026
केज ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- एका साडेसतरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील महिला ही शेतात मजुरीने गेली होती. तिची साडेसतरा वयाची मुलगी ही घरी एकटीच होती. संशयित आरोपी अजय रामा गालफाडे (रा. साळेगाव ता. केज) हा पुणे जिल्ह्यात ट्रक चालवित आहे. त्याने त्याच्या केज तालुक्यातील आजोळातून एका साडे सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेवून तिचे अपहरण केले.
अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारी वरून संशयित अपहरणकर्ता अजय गालफाडे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १३५/२०२६ भा. न्या. सं. १३७(२) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे हे करीत आहेत.