Breaking
Updated: मार्च 18, 2026
विजयप्रकाश ठोंबरे यांच्यासह लिपिकावर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड :- माहिती अधिकारात विद्यार्थी आणि शासकीय कर्मचारी यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र हस्तगत करून त्याचा गैरवापर केल्या प्रकरणी सूतगिरणीचे तत्कालीन चेअरमन आणि तत्कालीन लिपिक यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १७ मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते मी अनिल कचरु तुरुकमारे, (रा. अंकुश नगर, हनुमान मंदीराच्या बाजुला, बीड, ता. जि. बीड) यांनी केज येथील पोलीस ठाणे केज येथे दखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा ऋषिकेश हा स्पर्धा परीक्षाची तयारी करीत आहे. तो सन २०१६-१७ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमध्ये केशरबाई क्षिरसागर महाविद्यालय, बीड हया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्यावेळी कॉलेज मार्फतीने ऋषिकेश याचे जात पडताळणी करुन मिळणे बाबत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय, बीड येथे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा जात पडताळणी समिती यांनी सन २०१७ मध्ये ऋषिकेश हयाचे जात पडताळणी प्रमाण पत्र क्र. ३९६८५ दि. ३०/३/२०१७ हे निर्गमित केले होते.
दरम्यान, अनिल तुरुकमारे यांचे मित्र सचिन भीमराव चव्हाण, (रा. धोबीघाट, अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांच्या मार्फत सन २०२०-२१ मध्ये त्यांना माहिती मिळाली की, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी म. केज येथील तत्कालीन लिपिक राजकुमार दयाराम वाव्हळे यांनी संशोधन अधिकारी, जात पडताळणी समिती बीड यांचेकडे माहिती अधिकारात अर्ज करून जानेवारी २०१७ ते मार्च २०१७ या कालावधीत ज्या ज्या अर्जदारांनी निवडणूक, शैक्षणिक व नोकरी या कारणास्तव जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणेसाठी प्रस्ताव सादर केला, त्या सर्व अर्जदारांचे अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्रांची मागणी केली होती. त्याद्वारे लिपीक राजकुमार दयाराम वाव्हळे यांना दि १२/०७/२०१७ ते दि १०/०९/२०२० या कालावधीत माहिती अधिकारात जिल्हा जात पडताळणी समितीद्वारे अनिल तुरुकमारे यांचा मुलगा ऋषिकेश याच्यासह एकूण ४६४ अर्जदारांचे जात वैधता प्रमाणपत्रे देण्यात आले होते.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे तत्कालीन अध्यक्ष विजयप्रकाश किसनराव ठोंबरे आणि राजकुमार दयाराम वाव्हळे, तत्कालीन लिपीक यांनी माझ्या मुलासह इतरांना आमच्या संमती शिवाय सूत गिरणीच्या रेकॉर्डवर सभासद दाखवून ती यादी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, संभाजीनगर यांचे कार्यालयात देवुन ती प्रमाणित करून घेतली. ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, संभाजीनगर यांचे कार्यालयात तक्रार अर्ज दिला. त्या नंतर सूत गिरणीचे अध्यक्ष विजयप्रकाश किसनराव ठोंबरे यांनी अनिल तुरुकमारे यांचा मुलगा ऋषिकेश तुरुकमारे याचे नाव असलेली सभासदाची यादी रद्द केली.
सूतगिरणीचे तत्कालीन अध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे व लिपिक राजकुमार दयाराम वाव्हळे व इतरांनी संगनमत करून अनिल तुरुकमारे यांचा मुलगा ऋषिकेश आणि इतर याचा समावेश असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी व काही नोकरीधारक यांची जात वैधता प्रमाणपत्रे जात पडताळणी कार्यालया बीड येथुन माहिती अधिकारात हस्तगत करून महाविद्यालयीन विद्यार्थी व काही नोकरीधारक यांना त्यांचे परवानगी शिवाय आणि परस्पर कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी सूतगिरणीचे सभासद दाखविले म्हणुन लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी मर्यादित, केज, जि. बीडचे तत्कालीन अध्यक्ष विजयप्रकाश किसनराव ठोंबरे रा. केज ता केज आणि सूत गिरणीचे तत्कालीन लिपीक राजकुमार दयाराम वाव्हळे रा. हातोला ता. अंबाजोगाई जि बीड व त्यांना मदत करणाऱ्या विरुद्ध गु. र. नं. १३५/२०२६ भा. दं. वि. ४२०,३४
नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.