Breaking

अंबाजोगाई बस स्थानक झाले चकाचक

Updated: मार्च 17, 2026

By Vivek Sindhu

योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

अंबाजोगाई(प्रातिनिधी) – योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी अंबाजोगाई बसस्थानक चकाचक केले. विद्यार्थ्यांनी बसस्थानक परिसरातील झुडपे, गवत काढले तसेच हातामध्ये झाडू घेऊन परिसर पुर्णपणे स्वच्छ केला. काम करणाऱ्या विद्यार्थ्याना बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनीही मदत केली.अवघ्या दोन तासात बस स्थानक चकाचक स्वच्छ झाले. जवळपास १५० विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सक्रीय होते. या उपक्रमाकरिता प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रा.नारायण सिरसाट, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.शाम गडदे, प्रा.प्रियंका गंभीरे, प्रा.निशांत मस्के,डॉ. संकेत तोरंबेकर, ज्ञानेश्वर धुमाळ, विश्वजीत इंगळे,योगेश देशपांडे आदींनी उस्फुर्तपणे सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी अंबाजोगाई आगार प्रमुख अमर राऊत व स्थानक प्रमुख हरिदास गिरी,योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे उपस्थित होते.


Categories

Recent Posts