Breaking

गोशाळांना औषधींचे वितरण

Updated: मार्च 16, 2026

By Vivek Sindhu

विश्व हिंदू परिषदेचेचा उपक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

विश्व हिंदू परिषदेचेचा उपक्रम

अंबाजोगाई -: येथील विश्व हिंदू परिषद व साई मेडिकल एजन्सी यांच्या वतीने अंबाजोगाई व परिसरातील गोशाळांना लागणाऱ्या औषधींचे वितरण करण्यात आले.
रविवारी खोलेश्वर महाविद्यालयाच्या गोपीनाथराव मुंडे सभागृहात
विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रांत निरीक्षक ॲड. सुजित देशपांडे, गौरीशंकर कौलखेरे उपस्थित होते. नूतन आंबेजोगाई जिल्हा कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ गोपाळ चौसाळकर ,मंत्री ॲड .बाळकृष्ण तेरकर, सहमंत्री शैलेश पांडे, साईनाथ उपरे, निलेश डहाळे ,प्रांत सेवा प्रमुख डॉ मुकुंद कुलकर्णी, शिवाजीराव कुलकर्णी दिपेवडगावकर ,अविनाश अघोर ,अक्षय सातपुते, पुरी महाराज घाटनांदुर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय राम कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.
तर यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्व हिंदू परिषदेतर्फे, साई मेडिकल एजन्सी च्या सौजन्याने परिसरातील गोशाळांना औषधींचे वितरण करण्यात आले.


Categories

Recent Posts